[go: up one dir, main page]

Google Play वरील खरेदी मंजुरी

तुम्ही कुटुंब गटामध्ये पालक असल्यास, कुटुंबातील सदस्यांना Google Play वर आशय खरेदी करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी तुमची परवानगी घेणे आवश्यक आहे. खरेदी मंजुरी सेटिंग्ज ही फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीवर लागू होतात.

खरेदी मंजुरी सेटिंग्ज बदला

तुम्ही कुटुंब गटामध्ये कुटुंब व्यवस्थापक असल्यास, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी खरेदी मंजुरी सेटिंग्ज निवडू शकता. तुम्ही कुटुंब गटामध्ये पालक असल्यास, Family Link वापरून व्यवस्थापित केलेली खाती असलेल्या कुटुंब सदस्यांसाठी खरेदी मंजुरी सेटिंग्ज निवडू शकता.

Google Play ॲप
  1. Google Play अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब आणि त्यानंतर कुटुंब सदस्य व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. कुटुंब सदस्याचे नाव निवडा.
  5. खरेदी मंजुरी वर टॅप करा.
  6. तुम्हाला मंजुऱ्या आवश्यक असणे हवे असलेल्या खरेदीचे प्रकार निवडा:
    • सर्व आशय
    • कुटुंब पेमेंट पद्धत वापरून केलेली सर्व खरेदी
    • फक्त अ‍ॅपमधील खरेदी
    • कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही
Family Link अ‍ॅप
  1. तुमच्या डिव्हाइसवर, Family Link अ‍ॅप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल आणि त्यानंतर आशयासंबंधित बंधने आणि त्यानंतर Google Play वर टॅप करा.
  3. "खरेदी आणि डाउनलोडशी संबंधित मंजुऱ्या" याच्या अंतर्गत, यासाठी मंजुरी आवश्यक आहे वर टॅप करा.
  4. तुम्हाला द्यायच्या असलेल्या खरेदी मंजुरीचा प्रकार निवडा:
    • सर्व आशय
    • फक्त सशुल्क आशय
    • फक्त अ‍ॅपमधील खरेदी
    • कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही

विनंत्यांना मंजुरी द्या किंवा त्या नाकारा

तुम्ही कुटुंब गटामध्ये पालक असल्यास, Google Play वरील आशयासाठी विनंत्यांना मंजुरी देऊ शकता किंवा त्या नाकारू शकता.

Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे खरेदी पूर्ण केल्यावर, कुटुंब व्यवस्थापकाला ईमेलवर पावती मिळते.

तुम्ही Google Kids Space सेटिंग्ज मधील Google Kids Space मध्ये स्वतंत्रपणे डाउनलोड केलेल्या शिफारस केलेल्या अ‍ॅप्ससाठी मंजुऱ्या व्यवस्थापित करू शकता.
सशुल्क आशय
  1. कुटुंब सदस्य हा Google Play ची बिलिंग सिस्टीम वापरून खरेदी करतो, तेव्हा त्याला तुमचा पासवर्ड मागणारी एक स्क्रीन दिसेल.
  2. विनंतीचे पुनरावलोकन करा.
  3. मंजूर करण्यासाठी, त्यांच्या डिव्हाइसवर तुमचा Google खाते पासवर्ड एंटर करा.
  4. मंजूर करा वर टॅप करा.
कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध असलेला आशय

Family Link वापरून व्यवस्थापित केलेले Google खाते असलेल्या लहान मुलासाठी Play वरील आशयाकरिता पालकाची मंजुरी आवश्यक असल्यास, ते आशय डाउनलोड किंवा अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा, त्याला पुढील दोन पर्याय असलेली स्क्रीन दिसेल:

मेसेज पाठवून विचारणे

अ‍ॅपमध्ये थेट या सेटिंगवर जाऊन, खालील बटणावर टॅप करा:

मंजुरी विनंत्या व्यवस्थापित करा

  1. तुम्हाला तुमच्या फोनवर सूचना मिळेल.
  2. विनंतीचे पुनरावलोकन करा. आणखी तपशील पाहण्यासाठी, विनंती किंवा अ‍ॅपच्या नावावर टॅप करा.
  3. मंजूर करा किंवा नाकारा वर टॅप करा.

आता विचारा

  1. तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवरील विनंतीचे पुनरावलोकन कराल.
  2. ती मंजूर करण्यासाठी, त्यांच्या डिव्हाइसवर तुमचा Google खाते पासवर्ड एंटर करा.
  3. मंजूर करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही Family Link अ‍ॅप किंवा Play Store अ‍ॅपसाठी सूचना बंद केल्यास, विनंती असल्यावर तुम्हाला सूचित केले जाणार नाही.
आशयासाठीच्या प्रलंबित विनंत्या शोधणे

Play Store अ‍ॅप

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Play Store अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब वर टॅप करा.
  3. मंजुरी विनंत्या व्यवस्थापित करा वर टॅप करा.

Family Link अ‍ॅप

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Family Link अ‍ॅप Family Link उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सूचना वर टॅप करा.
खरेदीच्या विनंत्या मागे घेणे
कुटुंब सदस्य त्यांच्या Android डिव्हाइसवर, Google Play ऑर्डर इतिहास टॅब वरून त्यांच्या प्रलंबित सशुल्क खरेदीच्या विनंत्या मागे घेऊ शकतात.
कुटुंब पेमेंट पद्धत न वापरता केलेल्या खरेदीच्या विनंत्या

तुम्ही कुटुंब व्यवस्थापक असल्यास आणि कुटुंब पेमेंट पद्धत जोडली नसल्यास, खरेदी करण्यासाठी तुमचे कुटुंब सदस्य तुमच्या मंजुरीची विनंती करू शकतात. कुटुंब पेमेंट पद्धतीबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही Google Play भेटकार्डसह, तुमच्या Google Play खात्यामध्ये जोडलेली कोणतीही पेमेंट पद्धत वापरून खरेदी पूर्ण करू शकता. तुम्ही खरेदी पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या Google खात्यामध्ये ईमेल कन्फर्मेशन मिळेल. खरेदी तुमचा Google Play ऑर्डर इतिहास यामध्ये दिसेल.

तुमच्या कुटुंब सदस्यांनी खरेदीची विनंती केल्यास, त्यांनादेखील खरेदीचा कन्फर्मेशन ईमेल मिळेल. खरेदी कन्फर्मेशन ईमेलसह, Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीवर तुमची खरेदी मंजुरी सेटिंग्ज लागू होतात.

टिपा:

  • कुटुंब सदस्य सशुल्क अ‍ॅप्स खरेदी करण्यासाठी किंवा अ‍ॅपमधील खरेदी करण्यासाठी मंजुरीची विनंती करू शकतात. यामध्ये Play Books, Google TV किंवा सदस्यत्व खरेदीचा समावेश नाही.
  • तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत जोडल्यास, तुमच्या कुटुंब गटासाठी कुटुंब पेमेंट पद्धतीशिवाय खरेदीच्या विनंत्या उपलब्ध होणार नाहीत.
  • कुटुंब सदस्य कुटुंब व्यवस्थापकाच्या परवानगीशिवाय त्याची पेमेंट पद्धत पाहू किंवा वापरू शकत नाहीत.
  • कुटुंब व्यवस्थापक खरेदीच्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी पूर्वी रिडीम केलेल्या प्रमोशनपर ऑफर वापरू शकत नाहीत किंवा नवीन प्रमोशनपर ऑफर रिडीम करू शकत नाहीत. Google Play वरील ऑफरबद्दल अधिक जाणून घ्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5917435763336604882
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false