[go: up one dir, main page]

Google वर तुमचे कुटुंब व्यवस्थापित करणे

कुटुंब व्यवस्थापक म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी जास्तीत जास्त पाच लोकांना आमंत्रित करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंब गटातून लोकांना काढूनदेखील टाकू शकता किंवा कुटुंब गट हटवू शकता.

कुटुंब सदस्य जोडा

तुम्ही पुढील कुटुंब सदस्यांना जोडू शकता:

  • तुम्ही राहात असलेल्या देशात राहाणारे.
  • किमान १३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय (अथवा तुमच्या देशातील लागू वय) असणारे. १३ वर्षे वयाखालील मुलांचे Gmail खाते कुटुंब व्यवस्थापकाने तयार केले असेल तरच त्यांना जोडले जाऊ शकते.
टीप: एखादी व्यक्ती तुमच्या कुटुंब गटामध्ये सामील होते, तेव्हा तुम्हाला ईमेल सूचना मिळेल.
Play Store अ‍ॅप
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब आणि त्यानंतर कुटुंब सदस्य व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. कुटुंब सदस्यांना आमंत्रित करा आणि त्यानंतर पाठवा वर टॅप करा.
Family Link अ‍ॅप
महत्त्वाचे: Family Link उपलब्धता काही देशांमध्ये मर्यादित असू शकते. Family Link ॲप डाउनलोड करणे.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Family Link Family Link उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू Menu आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्थापित करा आणि त्यानंतर आमंत्रणे पाठवा वर टॅप करा.
Google One अ‍ॅप

कुटुंब गटामधील कोणीही Google One सदस्यत्व खरेदी करू शकते आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह, कमाल एकूण सहा सदस्यांसोबत शेअर करू शकते.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google One अ‍ॅप Google One उघडा.
  2. सर्वात वरती, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. कुटुंब सेटिंग्ज व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. तुमच्या कुटुंबासह Google One शेअर करा सुरू करा. निश्चित करण्यासाठी पुढील स्क्रीनवर, शेअर करा वर टॅप करा.
  5. कुटुंब गट व्यवस्थापित करा आणि त्यानंतर कुटुंब सदस्यांना आमंत्रित करा वर टॅप करा.
  6. सेटअप पूर्ण करण्यासाठी सूचना फॉलो करा.
Google Assistant अ‍ॅप
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा अथवा Assistant सेटिंग्ज वर जा.
  2. तुम्ही आणि त्यानंतर तुमचे लोक आणि त्यानंतर व्यक्ती जोडा वर टॅप करा.
  3. तुम्हाला जोडायचा असलेला संपर्क निवडा.
  4. कुटुंब गट सुरू करा.
  5. त्यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कंफर्म करा आणि हा ईमेल वापरा आणि त्यानंतर सेव्ह करा वर टॅप करा.

तुमच्या कुटुंब गटामधून एखाद्या व्यक्तीला काढून टाका

तुम्ही कुटुंब व्यवस्थापक असल्यास, तुम्ही विविध मार्गांनी तुमच्या कुटुंब गटामधील लोकांना काढून टाकू शकता.
तुम्ही तुमच्या कुटुंब गटामधून एखाद्या व्यक्तीला काढून टाकता, तेव्हा काय होते
  • तुम्ही तुमच्या कुटुंब गटामधून काढून टाकलेली व्यक्ती:
    • त्यांचे Google खाते आणि त्यांनी त्यांच्या डिव्हाइसवर कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेला कोणताही आशय ठेवू शकतात.
    • कुटुंब पेमेंट पद्धत वापरून कोणतीही नवीन खरेदी करू शकत नाही किंवा तुमचा कुटुंब गट शेअर करत असलेल्या कोणत्याही सेवा अ‍ॅक्सेस करू शकत नाही.
    • त्यांना काढून टाकले जाते, तेव्हा त्यांना ईमेल सूचना मिळते.
    • तुमच्या कौटुंबिक लायब्ररी मधील कोणत्याही गोष्टींचा अ‍ॅक्सेस गमावते.
    • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास, तुमच्या शेअर केलेल्या स्टोरेजचा अ‍ॅक्सेस गमावते. 
    • सदस्यांसाठी असलेले अतिरिक्त फायदे आणि Google तज्ञ यांचा अ‍ॅक्सेस गमावते.
  • तुम्ही काढून टाकलेल्या व्यक्तीने पुढील गोष्टी केल्यास:
    • कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केल्यास आणि त्यावर आधीच प्रक्रिया होत असल्यास: तुम्हाला अजूनही शुल्क आकारले जाईल, पण तुम्ही नको असलेल्या किंवा चुकून केलेल्या खरेदीसाठी परताव्याची विनंती करणे हे करू शकता.
    • कौटुंबिक लायब्ररी मध्ये आशय जोडल्यास: तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी सेट केल्यास, त्यांनी जोडलेला कोणताही आशय काढून टाकला जातो आणि इतर कुटुंब सदस्य त्या आशयाचा अ‍ॅक्सेस गमावतात.
    • त्यांचे वय १३ वर्षे (किंवा तुमच्या देशामधील लागू वय) अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही व तुमच्या लहान मुलाने Family Link वापरून त्यांचे खाते व्यवस्थापित करण्याचे निवडल्यास: तुम्ही त्यांना कुटुंब गटामधून काढून टाकता, तेव्हा त्यांचे Google खाते आणि कोणतीही डिव्हाइस यापुढे पर्यवेक्षित केली जात नाहीत.
तुमच्या कुटुंब गटामधून लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते काढून टाका

कुटुंब गटामधून लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते काढून टाकण्यासाठी: 

मोबाइल किंवा वेब ब्राउझर

लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते काढून टाका

  1. g.co/YourFamily वर जा.
  2. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या लहान मुलाचे खाते निवडा.
  3. खात्याची माहिती आणि त्यानंतर सदस्य काढून टाका निवडा.
    • तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करावा लागू शकतो.
  4. काढून टाका निवडा.

इतर कुटुंब सदस्यांना काढून टाका 

  1. g.co/YourFamily वर जा.
  2. तुम्हाला ज्या कुटुंब सदस्याला काढून टाकायचे आहे तो सदस्य निवडा.
  3. सदस्य काढून टाका आणि त्यानंतर काढून टाका निवडा.
Play Store अ‍ॅप
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब कुटुंब सदस्य पहा वर टॅप करा.
  4. तुमच्या कुटुंब सदस्याच्या नावावर टॅप करा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सदस्य काढून टाका आणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.
Family Link अ‍ॅप
महत्त्वाचे: Family Link उपलब्धता काही देशांमध्ये मर्यादित असू शकते. Family Link ॲप डाउनलोड करणे.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Family Link ॲप Family Link उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू Menu आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या कुटुंब सदस्याला काढून टाकायचे आहे त्याच्यावर टॅप करा आणि त्यानंतर सदस्य काढून टाका.
Google One अ‍ॅप
  1. तुमच्‍या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google One Google One उघडा.
  2. सर्वात वरती, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. कुटुंब व्यवस्थापित करा आणि त्यानंतर कुटुंब गट व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला ज्या कुटुंब सदस्याला काढून टाकायचे आहे त्याच्यावर टॅप करा आणि त्यानंतर सदस्य काढून टाका.
Google Assistant अ‍ॅप
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा अथवा Assistant सेटिंग्ज वर जा.
  2. तुम्ही आणि त्यानंतर तुमचे लोक वर टॅप करा.
  3. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या कुटुंब सदस्यावर टॅप करा.
  4. कुटुंब गट बंद करा.
  5. तळाशी उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.
  6. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुमचा कुटुंब गट हटवा

तुम्ही कुटुंब व्यवस्थापक असल्यास, तुम्ही विविध मार्गांनी तुमचा कुटुंब गट हटवू शकता.
तुम्ही तुमचा कुटुंब गट हटवता, तेव्हा काय होते
महत्त्वाचे: तुम्ही कुटुंब गट हटवल्यानंतर, तो रिस्टोअर करू शकत नाही.
  • तुमच्या कुटुंब गटामधील प्रत्येकजण त्यांची Google खाती आणि त्यांनी त्यांच्या डिव्हाइसवर कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेला कोणताही आशय ते ठेवू शकतात.
  • तुमच्या कुटुंब सदस्यांनी कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केल्यास आणि त्यावर आधीच प्रक्रिया होत असल्यास, तुम्हाला अजूनही शुल्क आकारले जाईल, पण तुम्ही नको असलेल्या किंवा चुकून केलेल्या खरेदीसाठी परताव्याची विनंती करणे हे करू शकता.
  • तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी सेट केल्यास, तुमच्या कुटुंब गटातील प्रत्येकजण कुटुंबातील इतर सदस्यांनी कौटुंबिक लायब्ररी मध्ये जोडलेल्या आशयाचा अ‍ॅक्सेस गमावतो.
  • तुम्ही YouTube Music किंवा Google One यांसारख्या कुटुंब प्लॅनचे सदस्यत्व घेतले असल्यास, तुमचे कुटुंब त्या सेवेचा अ‍ॅक्सेस गमावते.
  • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास, तुमचे कुटुंब शेअर केलेल्या स्टोरेजचा अ‍ॅक्सेस गमावते. 
  • कुटुंब सदस्याचे वय १३ वर्षे (किंवा तुमच्या देशामधील लागू वय) अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही Family Link वापरून त्यांचे खाते व्यवस्थापित करण्याचे निवडल्यास, तुम्ही त्यांना कुटुंब गटामधून काढून टाकता, तेव्हा त्यांचे Google खाते व कोणतीही डिव्हाइस यापुढे पर्यवेक्षित केली जात नाहीत.
  • तुम्ही तुमचा कुटुंब गट हटवल्यास, तुम्ही पुढील १२ महिन्यांमध्ये फक्त एकदा दुसरा कुटुंब गट तयार करू शकता किंवा त्यामध्ये सामील होऊ शकता.
ज्या कुटुंब गटामध्ये लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते आहे तो हटवा
तुम्ही लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते असलेला कुटुंब गट हटवण्यापूर्वी, त्यांचे वय १३ वर्षे (किंवा तुमच्या देशामधील लागू वय) यापेक्षा कमी असल्यास आणि तुम्ही त्यांच्यासाठी Google खाते तयार केले असल्यास, तुम्ही त्यांचे Google खाते हटवणे आवश्यक आहे.
मोबाइल किंवा वेब ब्राउझर
  1. g.co/YourFamily वर जा.
  2. मेनू Menu आणि त्यानंतर कुटुंब गट हटवा निवडा.
Play Store अ‍ॅप
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब आणि त्यानंतर कुटुंब सदस्य व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर कुटुंब गट हटवा आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
Family Link अ‍ॅप
महत्त्वाचे: Family Link उपलब्धता काही देशांमध्ये मर्यादित असू शकते. Family Link ॲप डाउनलोड करणे.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Family Link ॲप Family Link उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू Menu आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. "कुटुंब गट हटवा" यामध्ये, कुटुंब गट हटवा निवडा.
  4. तुमचा पासवर्ड एंटर करा.
  5. हटवा वर टॅप करा.
Google One अ‍ॅप
  1. तुमच्‍या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google One Google One उघडा.
  2. सर्वात वरती, मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. कुटुंब सेटिंग्ज व्यवस्थापित करा आणि त्यानंतर कुटुंब गट व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर कुटुंब गट हटवा आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9287615250135274556
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false