[go: up one dir, main page]

Google वर कुटुंबामध्ये सामील व्हा

तुम्ही कुटुंब गटामध्ये सामील झाल्यावर, तुम्ही Google वर कुटुंब सेवा कमाल ५ कुटुंब सदस्यांसह शेअर करू शकता.
महत्त्वाचे: ५ कुटुंब सदस्यांमध्ये अशा कुटुंब सदस्यांचा समावेश आहे, ज्यांना तुमच्या कुटुंबात सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे, पण अद्याप त्यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारलेले नाही.

कुटुंब गट कसे काम करतात

तुम्ही कुटुंब गटामध्ये सामील झाल्यावर, तुम्ही हे करू शकता:

  • कुटुंब पेमेंट पद्धत वापरा: तुम्ही Google Play वरील खरेदीसाठी ती वापरणे हे करण्यापूर्वी तुमच्या कुटुंब व्यवस्थापकाने कुटुंब पेमेंट पद्धत सेट करणे आवश्यक आहे.
  • कुटुंब सेवा वापरा: Google One, Google Play कौटुंबिक लायब्ररी आणि YouTube Premium कुटुंब प्लॅन यांसारख्या कुटुंब सेवा वापरा किंवा त्यांचे सदस्यत्व घ्या. १३ वर्षांखालील लहान मुलांना (किंवा त्यांच्या देशात लागू असलेले वय) काही YouTube वैशिष्ट्यांचा मर्यादित अ‍ॅक्सेस असेल. तुमच्या कुटुंबासाठी उपलब्ध सेवा शोधण्यासाठी, g.co/YourFamily वर जा. 

कुटुंब गटामध्ये सामील व्हा

एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्यांच्या कुटुंबात सामील होण्याचे आमंत्रित दिल्यास, तुम्हाला तुमच्या आमंत्रणासह ईमेल किंवा एसएमएस मिळेल. कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रणावरील सूचना फॉलो करा.

कुटुंबातील सदस्य एकमेकांबद्दल कोणती माहिती पाहतात

तुम्ही कुटुंबात सामील झाल्यावर, तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमचे नाव, फोटो आणि ईमेल अ‍ॅड्रेस पाहू शकतात.

तुमचा कुटुंब व्यवस्थापक कुटुंब पेमेंट पद्धतीसाठी जबाबदार असल्यामुळे, तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पावत्या त्यांना मिळतील.

तुमचे कुटुंब सदस्य तुमच्या कौटुंबिक लायब्ररी मध्ये जोडलेला आशय पाहू शकतात.

तुमचे कुंटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास, तुम्ही किती शेअर केलेले स्टोरेज वापरले आहे हे तुमचे कुटुंब सदस्य पाहू शकतील. तुमच्या फाइल तुमच्या कुटुंबासोबत शेअर केल्या जात नाहीत. Google One वर तुमच्या कुटुंबासह शेअर करणे कसे सुरू करावे किंवा थांबवावे हे जाणून घ्या.

कुटुंबामध्ये सामील होण्यासाठीच्या आवश्यकता

कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

  • Google खाते असावे. तुम्ही ऑफिस, शाळा किंवा इतर संस्थेचे Google खाते वापरून कुटुंबामध्ये सामील होऊ शकत नाही.
  • कुटुंब व्यवस्थापक राहात असलेल्या देशाचे रहिवासी असणे.
  • दुसऱ्या कुटुंब गटाचा भाग नसणे.
  • मागील १२ महिन्यांमध्ये कुटुंब गटांमध्ये स्विच केलेले नसणे.

कुटुंब गटामधून बाहेर पडा किंवा स्विच करा

तुम्ही कुटुंब गट स्विच करण्यापूर्वी, तुम्ही सध्या ज्या गटामध्ये आहात त्यामधून बाहेर पडणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या कुटुंब गटामधून बाहेर पडता, तेव्हा काय होते
  • तुम्ही दर १२ महिन्यांमध्ये एकदाच कुटुंबे स्विच करू शकता. तुम्ही कुटुंब गटामधून बाहेर पडून नव्या गटामध्ये सामील झाल्यास, तुम्हाला १२ महिने दुसऱ्या कुटुंब गटामध्ये सामील होता येणार नाही. तुम्ही Google One किंवा YouTube Premium यांसारखे Google चे सशुल्क सदस्यत्व वापरत असाल, तरच १२ महिन्यांचा नियम लागू होतो.
  • तुम्हाला कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी करता येणार नाही. कोणत्याही प्रलंबित खरेदीवर अजूनही शुल्क आकारले जाऊ शकते.
  • तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी आणि कुटुंब सदस्यांनी जोडलेल्या कोणत्याही आयटमचा अ‍ॅक्सेस गमवाल.
  • तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी मध्ये जोडलेली कोणतीही खरेदी काढून टाकली जाईल आणि तुमचे कुटुंब सदस्य तिचा अ‍ॅक्सेस गमवतील.
  • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास आणि तुम्ही Google One प्लॅन व्यवस्थापक असल्यास, तुमचे कुटुंब सदस्य हे तुमचे शेअर केलेले स्टोरेज वापरणे बंद करतील. एखाद्या व्यक्तीचे स्टोरेज संपल्यास, त्यांच्या फाइल सुरक्षित राहतील, पण ते नवीन गोष्टी स्टोअर करू शकणार नाहीत. लोकांची जागा संपल्यास काय होते याबद्दल अधिक जाणून घ्या.
    • तुमचे कुटुंब अतिरिक्त सदस्य फायदे आणि Google तज्ञ यांचा अ‍ॅक्सेसदेखील गमवेल.
  • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास आणि दुसरे कोणीतरी Google One प्लॅन व्यवस्थापक असल्यास, तुम्ही त्यांचे शेअर केलेले स्टोरेज, अतिरिक्त सदस्य फायदे व Google तज्ञ यांचा अ‍ॅक्सेस गमवाल.
  • तुमचे Google खाते आणि तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेला कोणताही आशय तुमच्याकडेच राहील.
तुमच्या कुटुंब गटामधून बाहेर पडा

महत्त्वाचे: तुम्ही कुटुंब व्यवस्थापक असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंब गटामधून बाहेर पडू शकत नाही.

मोबाइल किंवा वेब ब्राउझर

  1.  Google पेजवरील तुमचे कुटुंब ला भेट द्या.
  2. मेनू मेनू आणि त्यानंतर कुटुंब गटातून बाहेर पडा आणि त्यानंतर गटातून बाहेर पडा निवडा.
महत्त्वाचे: तुम्ही तुमचे कुटुंब वेगळ्या Google उत्पादनांवर सेट केले असल्यास (Play Store, Family Link, Google One), खालील सूचना फॉलो करत तुम्ही तुमचे कुटुंब त्या उत्पादनांमध्येदेखील सोडू शकता.

Play Store अ‍ॅप

  1. Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकन आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब आणि त्यानंतर कुटुंब सदस्य व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर कुटुंब गटातून बाहेर पडा आणि त्यानंतर गटातून बाहेर पडा वर टॅप करा.
  4. तुमचा पासवर्ड टाइप करा, त्यानंतर कंफर्म करा वर टॅप करा.

Family Link अ‍ॅप

महत्त्वाचे: फक्त ठरावीक भागांमध्ये Family Link उपलब्ध आहे. Family Link मिळवण्यासाठी, g.co/YourFamily येथे साइन अप करा.

  1. Family Link अ‍ॅप Family Link उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. "कुटुंब गटातून बाहेर पडा" मध्ये कुटुंब गटामधून बाहेर पडा निवडा.
  4. तुमचा पासवर्ड टाइप करा.
  5. कंफर्म करा वर टॅप करा.

Google One अ‍ॅप (Android)​

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google One अ‍ॅप Google One उघडा.
  2. मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब सेटिंग्ज व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. कुटुंब गट व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर कुटुंब गट सोडा आणि त्यानंतर ट सोडा वर टॅप करा.
  5. कंफर्म करा वर टॅप करा.

Google One अ‍ॅप (iPhone आणि iPad)

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google One अ‍ॅप Google One उघडा.
  2. मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर कुटुंब सेटिंग्ज आणि त्यानंतर Google कुटुंब सदस्य व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. विचारल्यास, तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन करा.
  4. आणखी More आणि त्यानंतर कुटुंब गट सोडा आणि त्यानंतर गट सोडा वर टॅप करा.
  5. तुमचा पासवर्ड एंटर करा.
  6. कंफर्म करा वर टॅप करा.

समस्या ट्रबलशूट करा

माझ्या आमंत्रणासंबंधित समस्या 

आमंत्रण आधीच वापरले होते

प्रत्येक आमंत्रणात युनिक साइन-अप लिंक असते, जी फक्त एकदाच वापरली जाऊ शकते.

तुम्ही तुमचे आमंत्रण दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड केल्यास, ते कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी तुमची युनिक लिंक वापरू शकतात.

तुम्ही तुमचे आमंत्रण दुसर्‍या Google खाते सह वापरल्यास, तुम्ही कुटुंब गटामधून बाहेर पडू शकता आणि तुमच्या इतर ईमेल अ‍ॅड्रेससह वापरण्यासाठी दुसरे आमंत्रण मागू शकता.

आमंत्रण एक्स्पायर झाले आहे

कुटुंबात सामील होण्याची आमंत्रणे दोन आठवड्यांत एक्स्पायर होतात.

तुमचे आमंत्रण एक्स्पायर झाले असल्यास, कुटुंब व्यवस्थापकाशी संपर्क साधा आणि त्यांना तुम्हाला नवीन आमंत्रण पाठवण्यास सांगा.

मला एरर आली

कुटुंब गटामध्ये सामील होताना समस्या आली

  • कुटुंब स्विच करणे: तुम्ही दर १२ महिन्यांनी एकदाच कुटुंबे स्विच करू शकता.
  • देशाचे निर्बंध: तुम्ही तुमचा कुटुंब व्यवस्थापक राहतो त्याच देशात राहणे आवश्यक आहे.

तुमचा कुटुंब गट बंद केला आहे

तुमच्या कुटुंब व्यवस्थापकाला त्यांचे खाते रिस्टोअर करण्यासाठी myaccount.google.com ला भेट देण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही आधीपासून कुटुंब गटामध्‍ये आहात

तुम्ही एका वेळी एकाच कुटुंब गटाचा भाग असू शकता. तुम्हाला वेगळ्या कुटुंब गटामध्ये सामील व्हायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या सध्याच्या कुटुंब गटामधून बाहेर पडावे लागेल, त्यानंतर नवीन गटामध्ये सामील व्हावे लागेल.

माझ्या कुटुंब व्यवस्थापकाने आमचा कुटुंब गट हटवला

तुमच्या कुटुंब व्यवस्थापकाने तुमचा कुटुंब गट हटवल्यास:

  • तुम्हाला कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी करता येणार नाही. कोणत्याही प्रलंबित खरेदीवर अजूनही शुल्क आकारले जाऊ शकते.
  • तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी आणि कुटुंब सदस्यांनी जोडलेल्या कोणत्याही आयटमचा अ‍ॅक्सेस गमवाल.
  • तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी मध्ये जोडलेली कोणतीही खरेदी काढून टाकली जाईल आणि तुमचे कुटुंब सदस्य तिचा अ‍ॅक्सेस गमवतील.
  • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास आणि तुम्ही Google One प्लॅन व्यवस्थापक असल्यास, तुमचे कुटुंब सदस्य हे तुमचे शेअर केलेले स्टोरेज वापरणे बंद करतील. एखाद्या व्यक्तीचे स्टोरेज संपल्यास, त्यांच्या फाइल सुरक्षित राहतील, पण ते नवीन गोष्टी स्टोअर करू शकणार नाहीत. लोकांची जागा संपल्यास काय होते याबद्दल अधिक जाणून घ्या.
    • तुमचे कुटुंब अतिरिक्त सदस्य फायदे आणि Google तज्ञ यांचा अ‍ॅक्सेसदेखील गमवेल.
  • तुमचे कुटुंब Google One सदस्यत्व शेअर करत असल्यास आणि दुसरे कोणीतरी Google One प्लॅन व्यवस्थापक असल्यास, तुम्ही त्यांचे शेअर केलेले स्टोरेज, अतिरिक्त सदस्य फायदे आणि Google तज्ञ यांचा अ‍ॅक्सेस गमवाल.
  • तुमचे Google खाते आणि तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेला कोणताही आशय तुमच्याकडेच राहील.

टीप: तुम्ही दरवर्षी फक्त एकदा कुटुंब गट बदलू शकता. तुम्ही नवीन कुटुंब गटामध्ये समील झाल्यास किंवा नवीन गट तयार केल्यास, तुम्हाला १२ महिने दुसऱ्या गटामध्ये सामील होता येणार नाही.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9786334998520812286
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false