Hotel Center by Google

सेवा अटी

 

Hotel Center by Google च्या या सेवा अटी (“अटी”) Google LLC (“Google”) आणि या अटी अमलात आणणारी किंवा या अटी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वीकारणारी व्यक्ती/संस्था (“प्रवास भागीदार”) यांमधील करार आहे.  या अटी प्रवास भागीदार याच्या Google Hotel Center चा वापर संचालित करतात, ज्यांमध्ये (i) प्रवास भागीदार याला या अटींच्या संबंधात दिल्या गेलेल्या खात्या(त्यां)मार्फत (“खाती”) अ‍ॅक्सेसिबल असलेल्या किंवा (ii) या अटी संदर्भाद्वारे अंतर्भूत करणार्‍या (एकत्रितपणे, “Hotel Center”) संबंधित सेवा, वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता (“सेवा”) यांचा समावेश आहे.  

 

1. Hotel Center वापरणे.  प्रवास भागीदार हा Google APIs मार्फत तसेच विविध मार्ग वापरून, Hotel Center ला डेटा, फीड किंवा इतर आशय (“आशय”) सबमिट करू शकतो. Google ने प्रवास भागीदार याला उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही सूचना किंवा तपशिलांचे पालन होईल अशा प्रकारे आशय सबमिट करण्यास प्रवास भागीदार सहमती दर्शवतो. Google हे प्रवास भागीदार याला Hotel Center मधील आशय दुसर्‍या Google सेवेवर एक्सपोर्ट, लिंक, ट्रान्सफर करण्यास किंवा इतर प्रकारे वापरण्यास परवानगी देणार्‍या कार्यक्षमता उपलब्ध करून देऊ शकते. त्या बाबतीत, प्रवास भागीदार याचा Hotel Center चा वापर या अटींनी संचालित केला जाणे सुरू राहणार असल्यास, प्रवास भागीदार याच्या अशा सेवेच्या वापराच्या संबंधात अशा इतर Google सेवेच्या अटी आणि नियम लागू होतील. प्रवास भागीदार ठरावीक पर्यायी Hotel Center सेवा वापरणे निवडत असल्यास, प्रवास भागीदार याने त्या विशिष्ट सेवांसाठी असलेल्या स्वतंत्र अटींना सहमती दर्शवणे आवश्यक असू शकते.  काही Hotel Center सेवा “बीटा” किंवा इतर प्रकारे सपोर्ट नसलेल्या अथवा गोपनीय म्हणून ओळखल्या जातात (“बीटा वैशिष्ट्ये”).  प्रवास भागीदार हा बीटा वैशिष्ट्ये यांमधील किंवा यांबद्दलची माहिती अथवा सार्वजनिक नसलेली कोणतीही बीटा वैशिष्ट्ये यांच्या अटी किंवा अस्तित्व उघड करू शकत नाही.  Google किंवा तिचे सहयोगी कधीही बीटा वैशिष्ट्यांसह, सेवा निलंबित करू शकतात, त्यांमध्ये सुधारणा करू शकतात किंवा त्या थांबवू शकतात.  या अटींच्या उद्देशांसाठी, “सहयोगी” म्हणजे अशी कोणतीही संस्था, जी वेळोवेळी थेट किंवा अप्रत्यक्ष Google नियंत्रित करते किंवा त्याद्वारे नियंत्रित आहे अथवा त्यासोबत सामाईक नियंत्रणाखाली आहे.

 

2. खाते.  प्रवास भागीदार याचा Hotel Center चा वापर हा एक किंवा त्यापेक्षा अधिक खाते(ती) तयार करणे आणि Google द्वारे मंजुरी मिळवणे यांच्या अधीन आहे.  खात्यांची पडताळणी करण्यासाठी आणि वेळोवेळी, Google ला अतिरिक्त माहितीची आवश्यकता असू शकते, ज्यामध्ये संस्थेचे कायदेशीर नाव, व्यवसाय ऑफरिंग, प्राथमिक संपर्क, फोन नंबर, पत्ता आणि संबंधित डोमेनचा समावेश आहे. प्रवास भागीदार हा त्याच्या Hotel Center च्या वापराला जबाबदार आहे, ज्यामध्ये खात्यांचा पूर्ण अ‍ॅक्सेस आणि वापर, खात्यांमार्फत Hotel Center ला सबमिट केलेला आशय तसेच खाते वापरकर्ता नावे व पासवर्ड यांची संरक्षक योजना यांचा समावेश आहे.

 

3. धोरणे

a. प्रवास भागीदार याचा Hotel Center चा वापर हा (i)  https://support.google.com/hotelprices/topic/11077677 येथे उपलब्ध असलेली लागू Google धोरणे आणि Google द्वारे वेळोवेळी सुधारणा केली जाऊ शकणारी, Google ने प्रवास भागीदार याला वेळोवेळी उपलब्ध करून दिलेली इतर सर्व धोरणे (एकत्रितपणे, “धोरणे”), (ii) या अटी व (iii) प्रवास भागीदार याचे लागू कायद्या(द्यां)चे पालन यांच्या अधीन आहेत. 

b. Hotel Center च्या संबंधात, (i) Google हे google.com/policies/privacy येथे उपलब्ध Google गोपनीयता धोरण (वेळोवेळी सुधारणा केले जाणारे) याचे पालन करेल आणि (ii)लागू असण्याच्या मर्यादेपर्यंत, Google आणि प्रवास भागीदार हे https://privacy.google.com/businesses/gdprcontrollerterms/ येथील Google नियंत्रक-नियंत्रक डेटा संरक्षण अटी (“डेटा संरक्षण अटी”) यांना सहमती दर्शवतात.  डेटा संरक्षण अटी अंतर्गत स्पष्टपणे परवानगी असल्याखेरीज, Google हे डेटा संरक्षण अटी यांमध्ये सुधारणा करणार नाही.

 

4. प्रवास भागीदार आशय.

a. प्रवास भागीदार हा Google किंवा तिचे सहयोगी यांची उत्पादने आणि सेवा यांच्या संबंधात, Google आणि तिचे सहयोगी यांना आशय वापरण्यासाठी शाश्वत, रद्द करता न येणारा, जागतिक, विनामूल्य परवाना देत आहे (बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केलेले असण्याच्या मर्यादेपर्यंत). प्रवास भागीदार सहमती दर्शवतो की, Google आणि तिचे सहयोगी आमच्यासाठी सेवा देणार्‍या आमच्या कंत्राटदारांना आणि आमच्या वापरकर्त्यांना हे अधिकार उपपरवान्याने देऊ शकतात जेणेकरून, त्यांना Google किंवा तिचे सहयोगी यांची उत्पादने आणि सेवा वापरण्याच्या संबंधात असा आशय वापरता येईल.

b. प्रवास भागीदाराने सबमिट केलेल्या आशयामध्ये URL किंवा त्यासारखा आशय असल्यास, प्रवास भागीदार Google आणि तिचे सहयोगी यांना URL आणि अशा URL मार्फत उपलब्ध असलेला आशय अ‍ॅक्सेस, अनुक्रमित, कॅशे किंवा क्रॉल करण्याचा अधिकार देतो (“गंतव्यस्थाने”).  उदाहरणार्थ, अशा URL शी संबंधित असलेल्या वेबसाइट मिळवण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी, Google एखादा ऑटोमेटेड सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरू शकते.  प्रवास भागीदार सहमती दर्शवतो, की Google किंवा तिचे सहयोगी यांनी गंतव्यस्थानांवरून गोळा केलेला कोणताही आशय हा आशय मानला जाईल आणि असे असल्याने, या अटींनुसार हाताळला जाईल.

c. Hotel Center वापरून, प्रवास भागीदार हा Google च्या आशयाच्या अधिकृत वापराच्या संबंधात, Google ला कोणतेही ट्रेडमार्क, सेवा चिन्हे, ट्रेड नावे, स्वामित्वविषयक लोगो, डोमेन नेम आणि इतर कोणतेही स्रोत किंवा व्यवसाय आयडेंटिफायर वापरण्याची परवानगी देतो.

 

5. चाचणी.  प्रवास भागीदार हा Google आणि तिचे सहयोगी यांना (a) प्रवास भागीदार याला सूचना न देता, प्रवास भागीदार याच्या सेवांवर (गंतव्यस्थाने, गुणवत्ता, रँकिंग, परफॉर्मन्स, फॉरमॅटिंग किंवा इतर अ‍ॅडजस्टमेंटशी संबंधित सेवांसह) परिणाम करू शकणार्‍या चाचण्या घेणे आणि (b) गंतव्यस्थाने परत मिळवणे आणि त्यांचे विश्लेषण ऑटोमेट करणे व ती अ‍ॅक्सेस करण्यासाठी चाचणी क्रेडेंशियल तयार करणे हे करण्याची परवानगी देतो.

 

6. हमी, अधिकार आणि कर्तव्ये.  प्रवास भागीदार प्रतिनिधित्व करतो आणि हमी देतो, की (a) प्रवास भागीदार याच्याकडे या अटींबाबत करार करण्याचा पूर्ण अधिकार आणि परवानगी आहे, (b) प्रवास भागीदार याच्याकडे कलम ४ मध्ये नमूद केलेले, परवाने आणि परवानग्या देण्याचे अधिकार आहेत आणि तो ते राखून ठेवेल, (c) प्रवास भागीदार हा धोरणे, लागू कायदा किंवा कोणत्याही लागू गोपनीयता धोरणांचे उल्लंघन करणारा अथवा कोणत्याही तृतीय पक्ष बौद्धिक संपदा अधिकारांचा भंग करणारा कोणताही आशय पुरवणार नाही, (d) लागू डेटा गोपनीयता किंवा डेटा संरक्षण कायदा अथवा नियम यांअंतर्गत संरक्षणाच्या अधीन, प्रवास भागीदार याच्याकडे Google ला एखाद्या व्यक्तीकडून गोळा केलेली किंवा तिच्याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्याचे सर्व आवश्यक अधिकार आणि संमती आहेत आणि (e) प्रवास भागीदार याने पुरवलेली माहिती आणि ऑथोरायझेशन (प्रवास भागीदार ऑफर डिस्प्ले करण्यासाठी आवश्यक असलेल्या, उत्पादनासंबंधी सर्व आवश्यक डिस्क्लोजरसह) पूर्ण, अचूक आणि सद्य आहेत व राहतील.

 

7. डिस्क्लेमर.  कायद्याद्वारे संपूर्ण व्याप्ती अनुमत, Google आणि तिचे सहयोगी हे   अभिप्रेत, वैधानिक किंवा इतर प्रकारच्या सर्व हमींचा अस्वीकार करतात, ज्यांमध्ये ना-उल्लंघन, समाधानकारक गुणवत्ता, विक्रीयोग्यता किंवा कोणत्याही उद्देशासाठी योग्यता, त्याचप्रमाणे कोणत्याही व्यवहारक्रमामधून अथवा व्यापाराच्या वापरामधून उद्भवणार्‍या हमींचा समावेश आहे.  कायद्याद्वारे संपूर्ण व्याप्ती अनुमत, Hotel Center आणि त्याच्या संबंधित सेवा या “जसे आहे”, “जसे उपलब्ध आहे” आणि “सर्व दोषांसह” या तत्त्वांवर पुरवल्या जातात व व्यापारी त्या स्वतःच्या जोखमीवर वापरतात. Google आणि तिचे सहयोगी हे Hotel Center किंवा त्याच्या संबंधित सेवांच्या संबंधात अथवा त्यांमधील कोणत्याही परिणामांच्या संदर्भात कोणत्याही हमी देत नाहीत. Google आणि तिचे सहयोगी हे व्यापार्‍यांना दोष किंवा एरर यांची माहिती देण्याचे वचन देत नाहीत.

 

8. दायित्वाची मर्यादा.  कायद्याद्वारे संपूर्ण व्याप्ती अनुमत, दाव्याचा सिद्धांत किंवा प्रकार लक्षात न घेता, (A) Google किंवा तिच्या एखाद्या सहयोगीला अशा इतर प्रकारच्या हानी शक्य आहेत याची जाणीव असली किंवा ते माहीत असले अथवा थेट हानी या उपाययोजनेची पूर्तता करत नसल्या तरीही, Google आणि तिचे सहयोगी यांना या अटींंच्या अंतर्गत किंवा त्यांमधून उद्भवणार्‍या किंवा त्या अटींच्या परफॉर्मन्सशी संबंधित थेट हानीव्यतिरिक्त इतर कोणत्याही हानीसाठी उत्तरदायी धरले जाणार नाही आणि (B) Google आणि तिचे सहयोगी यांना या अटींंच्या अंतर्गत किंवा त्यांमधून उद्भवणार्‍या किंवा त्या अटींच्या परफॉर्मन्सशी संबंधित हानीसाठी, कोणत्याही प्रसंगासाठी किंवा संलग्न प्रसंगांच्या मालिकेसाठी USD $५०००.०० पेक्षा जास्त एकूण रकमेकरिता उत्तरदायी धरले जाणार नाही.

 

9. नुकसान भरपाई.  लागू असलेल्या कायद्याद्वारे संपूर्ण व्याप्ती अनुमत, प्रवास भागीदार हा Google, तिचे सहयोगी, एजंट आणि परवानादाते यांचे सर्व दायित्वे, हानी, नुकसान, खर्च, शुल्क (कायदेशीर शुल्कासह) आणि प्रवास भागीदार याचा आशय, गंतव्यस्थाने, Hotel Center, त्याच्या संबंधित सेवांचा वापर किंवा प्रवास भागीदार याने या अटींचे केलेले कोणतेही उल्लंघन यांमधून उद्भवणारे कोणतेही तृतीय पक्ष खटल्याशी संबंधित खर्च यांपासून बचाव करेल आणि त्यांना हानीरक्षित करेल.

 

10. समाप्ती.  पुढील बाबतींत प्रवास भागीदार याचा Hotel Center, सेवा किंवा खाते(ती) यांचा अ‍ॅक्सेस किंवा वापर निर्बंधित, निलंबित किंवा (पूर्णपणे अथवा अंशतः) समाप्त करण्याचा अधिकार Google राखून ठेवते: (a) प्रवास भागीदार या अटी, कोणतीही धोरणे किंवा लागू कायदा(दे) यांचे उल्लंघन करत असल्यास, (b) कायदेशीर आवश्यकता किंवा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी Google ला तसे करणे आवश्यक असल्यास किंवा (c) प्रवास भागीदार याचे आचरण दुसरा प्रवास भागीदार, तृतीय पक्ष किंवा Google यांच्या हानी किंवा दायित्वाला कारणीभूत आहे असे Google ला वाजवीपणे वाटत असल्यास. प्रवास भागीदार याचा Hotel Center, सेवा किंवा खाते(ती) यांचा अ‍ॅक्सेस चुकून निर्बंधित, निलंबित किंवा समाप्त केला गेला आहे असे त्याला वाटत असल्यास, कृपया आमची धोरणे यांमधील आवाहन प्रक्रिया पहा. प्रवास भागीदार त्याचे खाते(ती) बंद करून आणि Hotel Center वापरणे थांबवून, कधीही या अटी समाप्त करू शकतो.

 

11. अटींमधील बदल.  Google या अटींमध्ये सूचना न देता महत्त्वाचे नसलेले बदल करू शकते, पण या अटींमधील कोणत्याही महत्त्वाच्या बदलांबाबत Google आगाऊ सूचना देईल. अटींमधील बदल पूर्वव्यापी प्रभावाने लागू होणार नाहीत आणि ते या पेजवर पोस्ट केल्यानंतर सात दिवसांनी लागू होतील. मात्र, कायदेशीर कारणांमुळे किंवा तातडीच्या परिस्थितींमध्ये केलेले बदल (जसे की, सुरू असलेला गैरवापर रोखणे) सूचना देऊन तात्काळ लागू होतील.

 

12. शासकीय कायदा; विवाद निराकरण. या अटी किंवा Hotel Center यांमधून उद्भवणारे अथवा त्यांच्याशी संबंधित सर्व दावे, कॅलिफोर्नियाच्या कायद्यांमधील विवादाबाबतचे नियम वगळून, कॅलिफोर्नियाच्या कायद्याद्वारे संचालित केले जातील आणि सांता क्लारा काउंटी, कॅलिफोर्निया, यूसएच्या फेडरल किंवा राज्य न्यायालयांमध्ये अनन्यपणे चालवले जातील; पक्ष या न्यायालयांमध्ये वैयक्तिक अधिकार क्षेत्राला संमती देतात.  प्रवास भागीदार हा लागू अधिकार क्षेत्रामध्ये स्थित असल्यास, या अटी किंवा Hotel Center यांमधून उद्भवणार्‍या अथवा त्यांच्याशी सबंधित Google सोबतच्या विवादाचे निराकरण मध्यस्थीमार्फत करण्यासाठीदेखील प्रवास भागीदार अर्ज करू शकतो. आम्ही ज्यांना नियुक्त करण्यास तयार आहोत त्या मध्यस्थांबद्दल आणि मध्यस्थीची विनंती कशी करायची त्याबाबतच्या सूचनांबद्दल येथे आणखी तपशील मिळवा. लागू कायद्याद्वारे आवश्यक असणे वगळता, मध्यस्थी ऐच्छिक आहे आणि प्रवास भागीदार किंवा Google यांपैकी कोणीही मध्यस्थीमार्फत विवाद सोडवणे अनिवार्य नाही.

 

13. संकीर्ण. (a) या अटी म्हणजे पक्षांचा त्यांच्या विषयाशी संबंधित संपूर्ण करारनामा आहे आणि तो त्या विषयांवरील कोणत्याही पूर्वीच्या किंवा समकालीन करारनाम्यांना अधिग्रहित करतो, ज्यांमध्ये प्रवास भागीदार याने या अटी स्वीकारल्यानंतर Hotel Center ला सबमिट केलेल्या आशयासाठीचा Google आणि प्रवास भागीदार यांमधील आशय परवाना करार या(यां)चा समावेश आहे. (b) प्रवास भागीदार या अटींनी विचारात घेतलेल्या संबंधांच्या संदर्भात (कायद्याद्वारे आवश्यक असल्याखेरीज) कोणतेही सार्वजनिक विधान करू शकत नाही. (c) Google द्वारे अनुच्छेद ११ अंतर्गत केल्या जाणार्‍या अटींमधील सुधारणा वगळता, या अटींमधील कोणत्याही दुरुस्तीला दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवणे आणि ते या अटींमध्ये दुरुस्ती करत आहेत असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. (d) समाप्ती किंवा उल्लंघनाच्या सर्व सूचना या लिखित स्वरूपात असणे आणि दुसर्‍या पक्षाच्या कायदेशीर विभागाच्या पत्त्यावर (किंवा दुसर्‍या पक्षाकडे कायदेशीर विभाग आहे का हे माहीत नसल्यास, दुसर्‍या पक्षाच्या प्राथमिक संपर्कावर अथवा फाइलवरील दुसर्‍या पत्त्यावर) पाठवले जाणे आवश्यक आहे. ईमेल म्हणजे लिखित स्वरूपातील सूचना असतात. Google च्या कायदेशीर विभागाला पाठवल्या जाणार्‍या सूचनांसाठी legal-notices@google.com हा ईमेल अ‍ॅड्रेस आहे.  प्रवास भागीदार याला पाठवल्या जाणार्‍या इतर सर्व सूचना लिखित स्वरूपात असतील आणि प्रवास भागीदार याच्या खात्याशी संबंधित ईमेल अ‍ॅड्रेसवर पाठवल्या जातील.   Google ला पाठवल्या जाणार्‍या इतर सर्व सूचना लिखित स्वरूपात असतील आणि त्या Google येथील प्रवास भागीदार याच्या प्राथमिक संपर्कावर किंवा Google ने उपलब्ध करून दिलेल्या इतर पद्धतीवर पाठवल्या जातील. लिखित स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना मिळाल्याचे कंफर्म केले गेल्यावर, ती दिली गेली आहे असे मानले जाईल. या सूचना आवश्यकता प्रक्रियेच्या कायदेशीर सेवेला लागू होत नाहीत, जी त्याऐवजी लागू कायद्याद्वारे संचालित असते. (e) कोणत्याही पक्षाने या अटींच्या अंतर्गत असलेले कोणतेही अधिकार न बजावल्यास (किंवा ते बजावण्यात दिरंगाई केल्यास), ते सोडून दिले आहेत असे समजले जाणार नाही. (f) या अटींची कोणतीही तरतूद अप्रवर्तनीय असल्याचे आढळल्यास, ती तरतूद विलग केली जाईल आणि बाकीच्या अटी पूर्णपणे प्रभावात आणि लागू राहतील. (g) प्रवास भागीदार या अटींच्या अंतर्गत असलेले त्याचे कोणतेही अधिकार किंवा कर्तव्ये Google च्या लिखित स्वरूपातील पूर्वसंमतीशिवाय नियुक्त करू शकत नाही.  (h) या अटींना कोणतेही तृतीय पक्ष हिताधिकारी नाहीत. (i) या अटी पक्षांमध्ये कोणतीही एजन्सी, भागीदारी, संयुक्त उपक्रम किंवा रोजगार संबंध तयार करत नाहीत. (j) अनुच्छेद १,४, ६-१० आणि १२-१३ हे या अटींच्या एक्स्पायरी किंवा समाप्तीनंतरही कायम राहतील. (k) कोणताही पक्ष किंवा त्याचे सहयोगी त्यांच्या वाजवी नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे उद्भवलेले परफॉर्मन्समधील अपयश किंवा दिरंगाई यांसाठी उत्तरदायी नाहीत.